
पिंपळनेर; पुढारी वृत्तसेवा : साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील रामनगर भागातील तीन बालकांचा नवापाडा रोडवरील पाट कॅनल मध्ये बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली. रामनगर भागातील हुजैफ हुसैन पिंजरी(वय१०), नोमान शैख मुख्तार (वय१२), अयान शाह शफी शाह (वय११) अशी त्या मृत बालकांची नावे आहेत.
ही तीन मुले सायंकाळी चार वाजताच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर घरी परत येत होते. यावेळी नवापाडा रोडवरील पाट कॅनलमध्ये पोहण्यासाठी गेले. दरम्यान पाणी जास्त असल्याने पाण्याचा अंदाज न आल्याने तीनही मुले पाण्यात बुडाली. या घटनेच्या माहीती कॅनल आजूबाजूच्या लोकांनी नुमान शेख मुख्तार याच्या काकाला सांगितली. ही माहिती मिळताच महेश वाघ, पप्पू पवार, मुश्रफ शेख, शब्बीर पटेल, आश्रफ पठाण, तेजस राठोड, गौतम पवार, मुशाहीद शेख, आत्तू पटेल, किरण वाघ, अक्षय अहिरे, राकेश पवार, कलीम पटेल हे तरुण घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाटात उडी मारली असता तीनही मुलांना बाहेर काढले.
संपूर्ण तालुक्यात या घटनेची माहिती वा-यासारखी पसरली. दरम्यान या घटनास्थळी लोकांनी जमाव केला. तीनही मुलांना बाहेर काढून पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात आणले. वैद्यकीय अधिकारी डॉ.राकेश मोहने यांनी तपासणी करून तीनही बालकांना मृत घोषित केले. त्यांचे शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात दिले.
हेही वाचा
- Mangesh Chivate : मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्ष पूर्ण क्षमतेने सुरू होणार; मंगेश चिवटे यांची कक्ष प्रमुखपदी नियुक्ती
- ये तो ट्रेलर है; उर्वरित वस्त्रहरण म्याव म्याव संपल्यावर करेन : नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा
- शिवसेना पक्षप्रमुख ‘त्या’ सर्व प्रश्नांची यादिवशी देणार; संजय राऊत यांचे सुचक वक्तव्य
The post नाशिक : धक्कादायक ! तीन बालकांचा पाट कॅनलमध्ये बुडून मृत्यू appeared first on पुढारी.