
पंचवटी : पुढारी वृत्तसेवा गंगापुर रोडवरून चोपडा लॉन्समार्गे मखमलाबाद रोडकडे जाणाऱ्या मार्गावरील धनदाई लॉन्स समोर एका महिंद्रा स्कॉर्पिओने पेट घेतल्याची घटना रात्री ९ च्या सुमारास घडली असून यात गाडी पुर्णपणे जळून खाक झाली आहे. सुदैवाने कुठलीही जीवित हानी झालेली नसून आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलास यश आले असून गाडीतील ३ ही लोक सुखरूप आहे. तसेच आगीचे कुठलेही कारण तुर्त समोर आलेले नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवार (दि १५) रोजी स्कॉर्पिओ गाडी क्रमांक एम एच १५ डी एस ६०५५ ही गंगापूर नाक्याकडून मखमलाबाद रोड मार्गे जात असताना सुमारे रात्री नऊ ते साडेनऊच्या दरम्यान हनुमान वाडी लिंक रोडवरील धनदाई लॉन्स समोर स्कॉर्पिओतून अचानक धूर निघू लागल्याने वाहनचालक प्रतिक संतोष कमानकर (वय २५, रा. गुरुजन सोसायटी, स्नेह नगर , म्हसरूळ) याने लागलीच गाडी रस्त्याच्या कडेला घेत. यातील सर्वांना गाडीतून उतरवले. व काही वेळातच गाडीने मोठया प्रमाणात पेट घेतला. रस्त्याने जाणाऱ्या काही नागरिकाने लागलीच अग्नीशामक दल व पोलिसांना सदर घटनेची माहिती कळविले. लागलीच अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल होत आग विझविण्यात आली. यासाठी एक बंब पाणी व दोन बॅरल फोमचा वापर करण्यात आला. यावेळी अग्नीशामक दलाचे वाहन चालक पी पी मोहिते, फायरमन एन पी म्हस्के, एस एच माळी, एम एस पिंपळे यांनी वेळीच घटनास्थळी वेळीच धाव घेत आग आटोक्यात आणली. पुढील तपास पंचवटी पोलीस करीत आहे.
हेही वाचलंत का?
- सुभाष देसाईंच्या मुलावरही कारवाई होणार का? सभागृहात एकनाथ खडसेंचा सरकारला संतप्त सवाल
- Ram Mandir : राम मंदिराचे काम वेगात सुरू : अयोध्या राम मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंद महाराज
The post नाशिक : धनदाई लॉन्स समोर बर्निंग कारचा थरार; स्कॉर्पिओने घेतला अचानक पेट appeared first on पुढारी.