नाशिक : धनादेश न वटल्याप्रकरणी एकास तीन महिने कारावासाची शिक्षा

नाशिक www.pudhari.news

नाशिक : कर्जाच्या परतफेडीसाठी दिलेला धनादेश न वटल्यामुळे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ग. म. कोल्हापूरे यांनी एकास आर्थिक दंडासह तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे. गणेश सिन्नरकर असे शिक्षा सुनावलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

श्री परशुराम नागरी सह पतसंस्था यांनी गणेश सिन्नरकर यास कर्ज दिले होते. कर्जाची परतफेड करण्यासाठी गणेशने पतसंस्थेस धनादेश दिले होते, मात्र ते बँकेत वटले नाही. त्यामुळे पतसंस्थेच्या वतीने गणेशविरोधात न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. पतसंस्थेच्या वतीने ॲड. जयदीप वैंशपायन, ॲड. प्रणव परशुरामी, ॲड. सचिन ढेपले यांनी युक्तीवाद केला. गणेश यांचा धनादेश न वटल्याचे सिद्ध झाल्याने न्यायालयाने त्यास शिक्षा सुनावली आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : धनादेश न वटल्याप्रकरणी एकास तीन महिने कारावासाची शिक्षा appeared first on पुढारी.