नाशिक : धारदार शस्त्राने वार करुन साडूनेच केला साडूचा खून

सुरगणा, पुढारी वृत्तसेवा :  सुर्यगड येथील माजी सरपंच मनोहर राऊत (वय ४५) यांचा खून त्यांच्याच साडूने केल्याची घटना बुधवारी (दि.१६) पहाटे साडेचारच्या सुमारास घडली. यामध्ये मयत राऊत यांची पत्नी आणि आरोपीची पत्नी जखमी झाल्या आहेत. भास्कर परशराम पवार असे आरोपीचे नाव असून पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. याबाबत मयत मनोहर राऊत यांची मुलगी रोशनी राऊत हिने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  याबाबत पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनिल आहेर हे पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचलंत का?

 

 

 

The post नाशिक : धारदार शस्त्राने वार करुन साडूनेच केला साडूचा खून appeared first on पुढारी.