नाशिक : धावती व्हॅन आगीत खाक; आठ जण सुखरूप

वाहनाला आग www.pudhari.news

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा

धावत्या काळी-पिवळी मॅजिक व्हॅनने पेट घेतल्याची घटना मनमाडपासून जवळच असलेल्या पुणे-इंदौर मार्गावर घडला. चालकाने प्रसंगावधान राखत तातडीने प्रवाशांना बाहेर काढल्याने जीवितहानी टळली असली तरी व्हॅनसकट प्रवाशांचे सामान जळून खाक झाले आहे.

याबाबत अधिक वृत्त असे की, शहरातील रेल्वेस्थानकातून काळी-पिवळी मॅजिक व्हॅन उत्तर प्रदेशातील आठ भाविक प्रवाशांना घेऊन शिर्डीला चालली होती. अंकाई किल्ल्याजवळ गाडीच्या पुढच्या भागातून मोठ्या प्रमाणात धूर निघताच चालकाने तातडीने गाडी रस्त्याच्या कडेला उभी करून भाविकांना गाडीतून खाली उतरविले. प्रवासी उतरताच आगीचा भडका उडून व्हॅन आगीच्या विळख्यात सापडली. त्यामुळे प्रवाशांचे गाडीतील सामानदेखील काढता आले नाही. व्हॅनला आग लागल्याचे पाहून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना त्यात यश आले नाही. अग्निशमन दलाचा बंब आला, परंतु तोपर्यंत संपूर्ण गाडी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती.

हेही वाचा:

The post नाशिक : धावती व्हॅन आगीत खाक; आठ जण सुखरूप appeared first on पुढारी.