
मालेगाव; पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना शासकीय ध्वजवंदनापूर्वी एका पुरवठादाराने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने एकच गोंधळ उडाला. सोमवारी (दि.१५) सकाळी पोलिस कवायत मैदानावर ही घटना घडली. अपर जिल्हाधिकारी ध्वज फडकविणार तत्पूर्वी, राजू मोरे यांनी अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्काळ त्यांना अटकाव करीत ताब्यात घेतले.
संवेदनशील मालेगाव शहरात सण उत्सव तसेच इतर वेळी सुरक्षेच्या कारणास्तव ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातात. काही वर्षांपासून मोरे यांना हे काम मिळतेय, मात्र त्याचे बिल अदा केले जात नाही. वरिष्ठ अधिकारी बदली होतात, पुन्हा नव्या अधिकाऱ्याकडे पाठपुरावा करावा लागतो तरी बिल मंजूर होत नाही. ९० लाखांचे बिल थकीत असल्याने मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत असल्याने हे पाऊल उचलल्याचे मोरे यांनी सांगितले. मोरे यांना कॅम्प पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.
हेही वाचा
- पुणे : अमृत महोत्सवाच्या नावाखाली लूट; काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आरोप
- लातूर : जीवनाच्या घडीपेक्षा राष्ट्रध्वजाच्या घडीची काळजी, पानचिंचोलीच्या वरटे कुटुंबियाकडून राष्ट्रध्वजाला मोफत इस्त्री
- भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यानिमित्त गुगलचं डुडल
The post नाशिक : ध्वजवंदनापूर्वी एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न appeared first on पुढारी.