नाशिक : नगरसूलला दोन शेततळ्यांतून वीजपंपांची चोरी

नगरसूल www.pudhari.news

नाशिक (नगरसूल) : पुढारी वृत्तसेवा

येथे चोरट्यांनी रात्री दोन शेतांतील शेततळ्यांतील वीजपंप चोरून नेले. येथील नगरसूल वाईबोथी रस्त्यालगत गणपती मंदिराजवळीत विनायक निकम यांच्या शेततळ्यातील पाणबुडी बाहेर ओढून पाइप व केबल तोडून चोरट्यांनी वीजपंप पळविला. तसेच शेजारील शेतातील शेतकरी भाऊसाहेब निकम यांच्या शेततळ्यावरील साधा मोनोब्लॉक वीजपंपही लंपास केला. हा सर्व प्रकार सकाळी शेतकऱ्यांच्या निदर्शनास आला असता, त्यांनी नगरसूलचे पोलिस हवालदार ठोंबरे यांना कळविले.

हेही वाचा:

The post नाशिक : नगरसूलला दोन शेततळ्यांतून वीजपंपांची चोरी appeared first on पुढारी.