
नाशिक (नगरसूल) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागात मंगळवारी रात्री विजेच्या कडकडाटासह गारपीट झाल्याने शेतीचे अतोनात नुकसान झाले. सुरुवातीला पाच मिनिटे टपोर्या गारानंतर पाच ते दहा मिनिटे लहान गारांचा मारा झाल्याने परिसरातील गव्हाचे अतोनात नुकसान झाले आहे. येवला तालुक्यातील नगरसूलसह परिसरात बेमोसमी पावसाने बुधवारी पहाटेपर्यंत हजेरी लावली. दिवसभर ढगाळ वातावरणाने पिकांवर बुरशीचा धोका निर्माण झाला आहे. उभ्या कांद्यांना औषधफवारणी करण्यासाठी शेतकरी खर्च करावा का नाही, अशा दुहेरी मनस्थितीत आहे.
हेही वाचा:
- नाशिक : मनपाच्या सफाई कामगारांचा जल्लोष, वारसा हक्काने नियुक्तीच्या सुधारित तरतुदी राज्य शासनाकडून मंजूर
- नगर : श्रीरामपूर डेपोच्या शिवशाही बसेसची दुरवस्था ; जादा गाडीभाडे देऊनही प्रवाशांची कुचंबणा
- नाशिकमध्ये ठिकठिकाणी मद्यपींसह विक्रेत्यांवर कारवाई
The post नाशिक : नगरसूलला रात्री गारपिटीचा फटका appeared first on पुढारी.