
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत नांदगावचा भूमिपुत्र असलेल्या प्रणव पाटील या तरुणाने वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षीच सैन्यदलात लेफ्टनंट पदाला गवसणी घातली आहे. प्रणवच्या या यशाबद्दल नांदगाव तालुक्यासह जिल्हाभरात काैतुकाचा वर्षाव होत आहे.
जयपूर येथील आर्मी पब्लिक स्कूलमध्ये प्रणवचे शिक्षण झाले. बारावीनंतर एनडीए खडकवासला पुणे येथे त्याची निवड झाली. याठिकाणी त्याने तीन वर्षे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर एक वर्ष आयएमए डेहराडून येथे प्रशिक्षण पूर्ण करून १० डिसेंबर रोजी पासआउट होऊन लेफ्टनंट झाला. प्रणव हा वैशाली व प्रताप पाटील यांचा सुपुत्र आणि नांदगाव येथील प्रसिद्ध सेवानिवृत्त शिक्षक एस. के. पाटील व इंदुमती पाटील यांचा नातू. प्रणव याचे वडील प्रताप पाटील हे वीस वर्षे भारतीय नौदलात व सध्या गॅरिसन इंजिनिअर अहमदनगर येथे कार्यरत आहेत. वडील बीटेक व आई एम.एस्सी.बी.एड. असलेल्या प्रणवला लहानणापासूनच सैनिकी वातावरण लाभले व आई-वडील, शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले. सैनिकी क्षेत्रात देशसेवा करण्यासाठी गेलेल्या प्रणव याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
हेही वाचा :
- कामशेत : प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे ; पीएमपीएल बसचालकांचा हलगर्जीपणा
- लाचेचा गुन्हा सिद्ध होण्यासाठी परिस्थितीजन्य पुरावा पुरेसा : सुप्रीम कोर्ट (Prevention of Corruption Act)
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा विसर पडल्याने समाजात दुफळी : उदयनराजे भोसले
The post नाशिक : नांदगावचा प्रणव पाटील २२ व्या वर्षीच लेफ्टनंट ! appeared first on पुढारी.