
नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क
पोलिस स्टेशनमध्ये जमा केलेला ट्रॅक्टर सोडविण्याकरिता 35 हजार रुपयांची लाच घेणा-या नांदगाव येथील दोघा पोलिस अधिका-यांना अटक करण्यात आली आहे. पोलिस हवालदार सुरेश पंडीत सांगळे (54), पोलिस शिपाई अभिजीत कचरु उगलमुगले(29) असे या पोलिस अधिका-याचे नाव आहे.
नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ही कारवाई केली. याप्रकरणातील तक्रारदार यांचा ट्रक्टर नांदगाव येथील पोलिस स्टेशनमध्ये जमा करण्यात आला होता. तो सोडवण्यासाठी दोघाही पोलिस अधिका-यांनी 35 हजारांची लाच मागितली. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता विभागाने दोघांवरही कारवाई केली आहे.
पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक नारायण न्याहळदे, पोलीस उपअधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे यांच्यासह पंकज पळशीकर, प्रभाकर गवळी, संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
हेही वाचा :
- Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांचा आक्षेपार्ह फोटो प्रसारीत करणाऱ्या करमुसेवर दोषारोपपत्र दाखल
- गोव्यातील काँग्रेसच्या ८ आमदारांनी घेतली मुख्यमंत्री सावंत यांची भेट
- जम्मू-काश्मीर : पूंछमध्ये बस दरीत कोसळून ११ जणांचा मृत्यू
The post नाशिक : नांदगावला 35 हजारांची लाच घेताना दोघा पोलिसांना पकडले appeared first on पुढारी.