
नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या ई-पिक पाहणीस तालुक्यातील शेतकऱ्यांकडून थंड प्रतिसाद मिळत आहे. यंदाच्या वर्षी तालुक्यात ऑगस्ट महिन्यात महसुल दिनाचे औचित्य साधत महसुल विभागामार्फत ई-पिक नोंदणी मोबाईल ॲपची सुरवात करण्यात आली. परंतु या ई-पिक पहाणीस तालुक्यातील ५५३३१ शेतकरी खातेदारांपैकी केवळ १४५६९ शेतकरी खातेदारांनी पिकांची नोदंणी करत पिक नोंदणीस प्रतिसाद दिला आहे.
तलाठी मार्फत करण्यात येत असलेली पिकांची नोंद शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने, शासनाने मोबाईल ॲप मार्फत पिक नोंदणी सुरु केली आहे. शेतकरी वर्गाकडून या ई-पिक नोंदणीस उदासिनता दिसून येत आहे. ई-पिक पाहणी संदर्भात, महसुल विभागामार्फत वारंवार जनजागृती केली जात आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची नोंद स्वत: शेतात जाऊन करायची असून, असे न केल्यास शेतकऱ्यांचा पिकपेरा कोरा राहू शकतो. त्यामुळे शासकीय मदत, अनुदान, पिक कर्जास शेतकऱ्यांना विविध आडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे लवकरात लवकर ई-पिक नाेंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुन्हा मुदत वाढ…
ई-पिक पाहणीस शासन स्तरावरुन मंगळवार, दि. १५ नोव्हेंबरपर्यंत पुन्हा मुदतवाढ देण्यात आली असुन, दिलेल्या मुदतीपर्यंत पिकांची नोंद मोबाईलद्वारे ई-पिक ॲपवरुन करता येणार आहे.
शेतकऱ्यांनी त्वरीत ई-पिक पाहणीसाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली असुन, पिकपाहणी न केल्यास विविध अडचणी निर्माण होऊ शकतात. तरी शेतकर्यांनी वाढीव मुदतीचा फायदा घेत लवकरात लवकर आपल्या पिकांची नोंदणी करावी. तसेच यासंदर्भात काही अडचण असल्यास गावातील तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांची मदत घ्यावी. – डाॅ. सिध्दार्थकुमार मोरे, तहसिलदार नांदगाव.
नांदगाव तालुक्यातील एकूण पिके अशी…
लागवडी खालील एकूण क्षेत्र हेक्टरमध्ये ६३९३४
ई-पिक पाहणी झालेले क्षेत्र हेक्टर मध्ये २३०३४.४२
एकूण खातेदार – ५५३३१
ॲपमार्फत पिक नोंद करणारे शेतकरी १४५६९
हेही वाचा:
- बेळगाव : पत्नीची छेड काढणाऱ्यास जाब विचारणाऱ्या पतीचा खून, संशयित ताब्यात
- गोवा : लोकांचे हाल; चक्का जाम … चोर्ला घाटात पाच तास कोंडी
- MG Motor India : एमजी मोटर इंडिया 2023 मध्ये भारतात ईलेक्ट्रिक कार लाँच करणार, वाचा वैशिष्ट्ये
The post नाशिक : नांदगाव तालुक्यात ई-पिक पहाणीस थंड प्रतिसाद appeared first on पुढारी.