
नाशिक (नांदगाव): पुढारी वृत्तसेवा
नांदगाव विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील रस्ते, पूल याच्यासह विविध विकस कांमावर लक्ष केंद्रित करत, आमदार सुहास कांदे यांच्या माध्यमातून पाठपुरावा करत अर्थसंकल्प-२०२३ मध्ये २१२ कोटींची कामे मंजूर करून घेण्यात यश मिळाले आहे.
सध्यस्थितीत मतदार संघातील काही भागातील रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झाले होते. तर अनेक रस्त्यांवर पूलच नसल्यामुळे वाहनधारकांना आणि नागरिकांना अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे. पावसाळ्याच्या कालावधीत तर नदी नाल्यांना पूर आल्यामुळे वाहतूक बंद होऊन अनेक गावे व वाड्या वस्त्यांचा संपर्क तुटतो. त्यामुळे अशा परिस्थितीत रस्त्यावर पूल बांधणे रस्त्यांची सुधारणा होणे आवश्यक होते. यासाठी आमदारांनी अर्थसंकल्पामध्ये रस्त्यांचे आणि पुलांचे कामासाठी निधी मंजूर करण्यासाठी पाठपुरावा केला असता, मतदार संघातील राज्य मार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग, इतर जिल्हा मार्ग आणि ग्रामीण मार्ग रस्त्यांची सुधारणा आणि पुलांच्या कामासाठी मोठा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी नांदगाव तालुक्यात ७९ कोटी दहा लक्ष निधी मंजूर करण्यात आला असून राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग रस्त्यांसाठी ३२ कोटी ६५ लक्ष तर इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग रस्त्यांसाठी ४५ कोटी ४५ लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे. नांदगाव विधानसभा मतदार संघातील तसेच मालेगाव तालुक्यातील रस्त्यांसाठी १२४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. रस्त्यांच्या तसेच पुलांच्या सुधारणांमुळे शेतकऱ्यांना बाजारपेठेत शेतीमाल ने आण करण्यासाठी तसेच नागरिकांना दळणवळणाच्या दृष्टिकोनातून सोयिस्कर होणार आहे.
ग्रामीण भागातील लोकांसाठी दळणवळण साठी रस्ते महत्वाच आसतो. मतदार संघातील या निधीच्या माध्यमातून आनेक ग्रामीण रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागेल या मुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल विक्रीस आणण्यास सोयिस्कर होईल. पुढिल काळात आजुन निधी आणण्याचा प्रयत्न आसेल. – सुहास कांदे, आमदार, नांदगाव.
हेही वाचा:
- सोलापूर : मराठी चित्रपटात भूमिका देण्याचे आमीष दाखवून दिग्दर्शकाचा तरूणीवर लैंगिक अत्याचार
- Oscar 2023 : हत्ती आणि मानवाच्या नात्याची गोष्ट सांगणारा The Elephant Whisperers
- व्हाईट शॉर्ट वनपीसमध्ये हॉट झाली मौनी रॉय
The post नाशिक: नांदगाव विधानसभा मतदार संघासाठी २१२ कोटींची कामे मंजूर appeared first on पुढारी.