नाशिक : नातीकडे राहण्यास आलेल्या वृद्धाचा थंडीने मृत्यू

मृतदेह आढळला,www.pudhari.news

नाशिक : नातीकडे राहण्यास आलेल्या ९० वर्षीय वृद्धाचा खोकला व थंडीमुळे मृत्यू झाला आहे. रामप्रसाद तोताराम उज्जैन (९०, रा. पंचशिल नगर, लहवित, सध्या रा. सुखदेव नगर, पाथर्डीगाव) असे या वृद्धाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रामप्रसाद हे दोन महिन्यांपासून पाथर्डीगावात राहणाऱ्या त्यांच्या नातीकडे राहण्यास आले होते. रविवारी (दि.२०) सकाळी आठच्या सुमारास राप्रसाद यांना खोकला व थंडी वाजून आल्याने त्यांना बिटको रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : नातीकडे राहण्यास आलेल्या वृद्धाचा थंडीने मृत्यू appeared first on पुढारी.