नाशिक : नात्याला काळीमा! प्रियकरासह जन्मदात्या बापानेच केला मुलीवर अत्याचार

अत्याचार

जळगाव : भुसावळ तालुक्यातील एका खेड्यात बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. जन्मदात्या बापासह प्रियकराने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वरणगाव पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरापासून जवळच असलेल्या एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीची फेसबुकवर एका मुलासोबत ओळख झाली होती. यातून दोघांमध्ये प्रेम जमले. दोघे जण २९ सप्टेंबर रोजी घरातून पळून गेले. मुलगी उशिरापर्यंत घरी न आल्यामुळे मुलीच्या वडीलांनी पोलिसात तक्रार दिली होती. सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष आडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार नरसिंग चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुजरातमधील सोरटी सोमनाथ येथून या दोघांना ताब्यात घेतले. मुलीला बालकल्याण समितीकडे सोपविण्यात आले. या समितीकडे मुलीने धक्कादायक जबाब दिला आहे.

प्रियकर व स्वतःच्या वडिलांनी आपल्यावर अत्याचार केल्याचे तिने सांगितले. यावरून वरणगाव पोलिसात दोघांच्या विरोधात भादवी कलम ३७६ प्रमाणे पोस्को कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. दोघांना दोन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पीएसआय परशुराम दळवी हे करीत आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : नात्याला काळीमा! प्रियकरासह जन्मदात्या बापानेच केला मुलीवर अत्याचार appeared first on पुढारी.