नाशिक : नानेगावला पुन्हा बिबट्या जेरबंद

नानेगाव बिबट्या जेरबंद

नाशिक, देवळाली कॅम्प :  पुढारी वृत्तसेवा
येथील नानेगाव परिसरात बिबट्याच्या दहशतीमुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर दहशत माजवणारा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

गेल्या काही दिवसांपासून नानेगाव परिसरात नागरिकांना सतत बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिक दहशतीखाली होते. याबाबत स्थानिक नागरिकांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देत पिंजरा लावण्याची मागणी करण्यात आली. वनविभागाने येथील शेतकरी मनोहर शिंदे यांच्या ऊसाच्या शेतालगत पिंजरा लावला.  काल सायंकाळच्या सुमारास अलगद बिबट्या या पिंजऱ्यात जेरबंद झाला. बिबट्या जेरबंद झाल्याची  वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली असता, अधिकारी घटनास्थळी येऊन बिबट्या ला घेऊन गेले.

हेही वाचा :

The post नाशिक : नानेगावला पुन्हा बिबट्या जेरबंद appeared first on पुढारी.