नाशिक : नामपूरमध्ये चंदन चोराचा सुळसुळाट

नामपूर चंदन www.pudhari.news

नाशिक (नामपूर) : पुढारी वृत्तसेवा
नामपूरसह मोसम खोर्‍यात अनेक शेतकर्‍यांनी शेतात व बांधावर चंदनाच्या झाडाची लागवड केली आहे. त्यावर चोरट्यांची वक्रदृष्टी पडली असून, रोजच एखाद्या झाडाची चोरी होत आहे.

बदलत्या युगात पारंपरिक पिकांना पर्याय म्हणून अनेक शेतकर्‍यांनी चंदनाची लागवड केली आहे. जागतिक स्तरावर चंदनाला मागणी सुद्धा खूप आहे. या झाडापासून सुगंध निर्माण करणारी उत्पादने होतात. कमी काळात भरघोस उत्पादन देणारे पीक म्हणून या शेतीकडे पाहिले जाऊ लागले आहे. मात्र, जसे लागवडीचे क्षेत्र वाढले तसा चोरट्यांचा उपद्रव वाढला आहे. मोसम खोर्‍यात रोज कुठे ना कुठे दोन ते तीन चंदनाच्या झाडाची कत्तल करून चोरटे पोबारा करत आहेत. स्थानिक पोलिसांकडे तक्रार केल्यावर साधी चौकशी सुद्धा होत नाही, अशा तक्रारी आहेत. चोर स्थानिक माहितीगारच असल्याचा संशय नागरिकाकडून व्यक्त होत आहे. चंदनचोरांचा तपास लागल्याची उदाहरण कमी असण्यामागील कारण काय असा सवालही उपस्थित केला जात आहे. नामपूर व जायखेडा पोलिस ठाण्यातील यंत्रणेने येत्या आठ दिवसात चोरट्याचा बंदोबस्त न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पोलिस ठाण्यात जाब विचारण्यात येईल, असा इशारा माजी आमदार दीपिका चव्हाण, संजय चव्हाण, अशोक सावंत, नामदेव सावंत, खेमराज कोर, सम्राट काकडे, शशिकांत कोर, चारुदत्त खैरनार, मेघदीप सावंत, रेखा शिंदे, सिंधु पाटील यांनी दिला आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : नामपूरमध्ये चंदन चोराचा सुळसुळाट appeared first on पुढारी.