नाशिक : नाश्ता पडला महागात, 29 तोळे सोने गायब

चोरी

चांदवड, पुढारी वृत्तसेवा ः वडाळीभोई शिवारातील मालेगावकर हॉटेलवर नाश्त्यासाठी थांबलेल्या बसमधून चोरट्यांनी नाशिकच्या महिला प्रवाशाच्या पर्समधील सात लाख 37 हजार रुपयांचे 29 तोळे सोन्याच्या दागिन्यांवर
डल्ला मारला. या घटनेबाबत त चोरीची फिर्याद दाखल करण्यात आली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नाशिकरोडच्या विजय-ममता चित्रपटगृहाजवळील शिवाजीनगर मधील रहिवासी पुष्पलता पाटील या नवापूर येथून नाशिककडे प्रवास करीत होत्या. वडाळीभोई येथील हॉटेल मालेगावकर येथे प्रवाशांना नाश्ता करण्यासाठी बस थांबली होती.

यावेळी बसमध्ये कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी पाटील यांनी बसमध्येच ठेवलेल्या पर्समधील डब्यातून पाच तोळे सोन्याचा नेकलेस, एक तोळे सोन्याचे कानातील झुबे, दीड तोळे सोन्याचा नेकलेस, साडेतीन तोळ्याचे मंगळसूत्र, तीन तोळ्याचा राणीहार, पाच ग्रॅम सोन्याची अंगठी, तीन तोळ्याची चेन, एक तोळ्याची अंगठी, सहा तोळे वजनाच्या पाटल्या, पाच तोळे सोन्याचा पोहेहार असा अंदाजे सात लाख 37 हजारांचे दागिने चोरत पोबारा केला.

सहायक पोलिस निरीक्षक गौतम तायडे, सहायक उपनिरीक्षक डी. पी. दोडे यांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे.

The post नाशिक : नाश्ता पडला महागात, 29 तोळे सोने गायब appeared first on पुढारी.