नाशिक : नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर उलटला, चालकाचा दबून मृत्यू

file photo

नाशिक (चांदवड)  : पुढारी वृत्तसेवा 

ट्रक्टर मध्ये डीझेल भरण्यासाठी रस्त्याने भरधाव ट्रक्टर घेऊन जात असताना चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक्टर रस्त्याच्या लगदच्या खड्यात जाऊन पलटी झाला. या दुर्घटनेत ट्रक्टरखाली चालक दबून २५ वर्षीय तरुण चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना चांदवड तालुक्यातील वडाळीभोई – वणी रस्त्यावरील धोडांबे गावच्या शिवारात घडली. या घटनेबाबत वडनेरभैरव पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

तालुक्यातील कुंडाणे येथून अजय वाल्मिक मोरे (२५, रा. वावी ठुशी निफाड) हा ट्रक्टर (एम. एच. ४१, बी. ई. ४५५९) मध्ये डीझेल भरण्यासाठी कुंडाणे गावातून धोडांबे मार्गे धोडांबे – वणी रोडवरील पेट्रोल पंपावर ट्रक्टर घेऊन जात होता. यावेळी वेगात असल्याने ट्रक्टरवरील त्यांचे नियंत्रण सुटून ट्रक्टर रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्यात पलटी झाला. यात अजय मोरे हा ट्रक्टर खाली दबला गेला. यात त्यांच्या डोक्यास, हातास, पायास जबरदस्त मार लागल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच वडनेरभैरवचे सहा. पोलीस निरीक्षक गौतम तायडे, पोलीस नाईक अजय घुमरे यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला आहे. या घटनेबाबत मयताचे वडील वाल्मिक श्रीपत मोरे (६७, रा, वावी ठुशी, निफाड) यांनी फिर्याद दिल्याने वडनेरभैरव पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर उलटला, चालकाचा दबून मृत्यू appeared first on पुढारी.