नाशिक : निळवंडीतील जवानाचा लडाखमध्ये मृत्यू

जवान आदित्य अशोक जाधव www.pudhari.news

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील निळवंडी येथील सैन्यजलातील जवान आदित्य अशोक जाधव यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत असून, याबाबत संबंधित विभागाकडून दूरध्वनीद्वारे त्यांचे नातेवाईक व पोलिसपाटील यांना माहिती प्राप्त झाली आहे. मात्र, शासकीय यंत्रणेकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. या घटनेमुळे दिंडोरी तालुक्यावर शोककळा पसरली आहे. निळवंडी येथील जवान आदित्य जाधव हे सैन्यदलात लडाख येथे कार्यरत होते. त्याचा मृत्यू झाल्याची माहिती संबंधित विभागाकडून दूरध्वनीद्वारे नातेवाईक व पोलिसपाटील यांना प्राप्त झाली आहे. याबाबत शासकीय यंत्रणा यांच्याशी संपर्क साधला असता अधिकृत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. तसेच त्याचा मृत्यू कसा झाला याबाबतही माहिती मिळालेली नाही.

हेही वाचा:

The post नाशिक : निळवंडीतील जवानाचा लडाखमध्ये मृत्यू appeared first on पुढारी.