Site icon

नाशिक : निवृत्तीनाथ संस्थानचा नावलौकीक वाढविणार – हभप कांचनताई उकार्डे

नाशिकरोड: पुढारी वृत्तसेवा

त्रंबकेश्वर येथील निवृत्तीनाथ महाराज संस्थान हे संपूर्ण भारतभर प्रसिध्द आहे. संस्थानचा नावलौकीक वाढविण्यासाठी आपण भर देणार असल्याचे प्रतिपादन हभप कांचनताई उकार्डे यांनी केले.

देवळाली कॅम्प येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी हभप कांचनताई उकार्डे व हभप निलेश महाराज गाढवे यांची त्रंबकेश्वर संस्थानवर विश्वस्त म्हणून तसेच माजी विद्यार्थी संग्राम करंजकर यांची एनडीएसटी सोसायटीवर संचालक म्हणुन नियुक्ती झाल्याबद्दल प्राचार्य डॉ. एस. एस. काळे यांच्या हस्ते सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. सत्काराला उत्तर देताना हभप निलेश महाराज गाढवे म्हणाले की, संस्थानच्या विस्तार अन आधुनिकीकरणासाठी आपण प्रयत्नशील राहू, असे सांगितले. संग्राम करंजकर यांनी प्रामणिक काम केल्यामुळे मला सभासदांनी संचालक म्हणून निवडून दिल्याचे म्हटले. अध्यक्षीय भाषणात बोलताना प्राचार्य डॉ. काळे यांनी माजी विद्यार्थ्यांची नियुक्ती महाविद्यालयासाठी गौरवास्पद असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : निवृत्तीनाथ संस्थानचा नावलौकीक वाढविणार - हभप कांचनताई उकार्डे appeared first on पुढारी.

Exit mobile version