नाशिक : नुकसानभरपाईसाठी निफाड पंचायत समितीचे पालकमंत्र्यांना साकडे

लालगाव नुकसान www.pudhari.news

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा
निफाड तालुक्यातील लासलगावसह परिसरात पावसाने जोरदार बरसात केल्याने पिकांचे नुकसान झाले असून, तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई मिळावी, या मागणीचे निवेदन निफाड पंचायत समितीचे माजी सभापती शिवा पाटील सुरासे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांना दिले आहे.

यावेळी खडक माळेगावचे ग्रामपंचायत सदस्य अनिल शिंदे, संजय शिंदे, नितीन शिंदे, लासलगाव खरेदी-विक्री संघाचे संचालक अनिल शिंदे, देवगावचे उपसरपंच लहानू मेमाने, राजेंद्र शिंदे, मनोज रायते, पंकज शिंदे, पुंडलिक शिंदे, अमोल शिंदे, बाळासाहेब शिंदे, विजाराम शिंदे, विक्रम शिंदे, दत्ता मापारी, टाकळी ग्रामपंचायत सदस्य हरीश गवळी, उमेश जाधव, संतोष बोराडे उपस्थित होते. यावेळी ना. भुसे यांनी निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे तसेच कृषी विभागाच्या अधिकार्‍यांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.

हेही वाचा:

The post नाशिक : नुकसानभरपाईसाठी निफाड पंचायत समितीचे पालकमंत्र्यांना साकडे appeared first on पुढारी.