नाशिक: नॅशनल रोईंग स्पर्धेत दत्तू भोकनळला रौप्य पदक

चांदवड; पुढारी वृत्तसेवा : चांदवड तालुक्यातील आशियाई सुवर्ण पदक विजेते, ऑलम्पियन दत्तू भोकनळ यांनी सीनियर नॅशनल रोइंग स्पर्धेमध्ये 500 मीटर सिंगल स्कल मध्ये रौप्य पदकाची कमाई केली. आर्मी रोईंग नोड पुणे येथे २० ते २६ फेब्रुवारीदरम्यान ही स्पर्धा झाली.

दत्तू भोकनळ यांनी अंतिम फेरीमध्ये सर्विसेस कडून खेळणारा व २०२० चा ऑलिम्पिक खेळाडू अरविंद सिंग तसेच इंडियन नेव्ही कडून खेळणारा सतनाम सिंग यांना पराभूत केले.

सतनाम सिंग हा दोन किलोमीटर मध्ये सुवर्णपदकाचा मानकरी आहे. तसेच अरविंद सिंह २०२० चा ऑलम्पियन आहे. ५ वर्षाच्या गॅप नंतर केलेल्या कामगिरीबद्दल आणि त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. मराठमोळ्या दत्तू भोकनळ यांनी पुन्हा एकदा मैदानात उतरून पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केले आहे.

हेही वाचा 

The post नाशिक: नॅशनल रोईंग स्पर्धेत दत्तू भोकनळला रौप्य पदक appeared first on पुढारी.