
नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा
नाशिक जिल्हा व शहरातील मनपा अधिकृत परवानाधारक व्यावसायिक जाहिरात फलक मालकांची संघटना ‘नोवा’ अर्थात, नाशिक जिल्हा आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग वेल्फेअर असोसिएशनच्या पहिल्या कार्यकारिणीची मुदत संपत असल्याने नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. यात स्काय साइन ॲडव्हर्टायझिंगचे संचालक विक्रम कदम यांची अध्यक्षपदी, बिग आय मिडियाचे संचालक इम्तियाज अत्तार यांची उपाध्यक्षपदी तर सरचिटणीसपदी श्री साक्षी ॲडव्हर्टायझिंगचे संचालक सचिन गिते यांची बिनविरोध निवड करण्यात आली. असोसिएशनच्या गुरूवारी (दि. ५) झालेल्या सभेत दोन वर्षांकरिता नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली.
उर्वरीत कार्यकारिणीत सहचिटणीसपदी साई साक्षी ॲडव्हर्टायझिंगचे संचालक महेश गिरमे, खजिनदारपदी सौरभ पब्लिसिटीचे संचालक सौरभ जालोरी, तर कार्यकारिणी सदस्य म्हणून रवी शिरसाठ, मनीष नाशिककर, गौरव माटे, निखिल सुराणा, हर्षद कुलथे, यांचा समावेश आहे.
जाहिरात फलक व्यवसायातील अडी-अडचणी, भविष्यातील आव्हाने, उपाययोजना व नाशिक महानगरपालिकेने जाहिरात कर व परवाना फिमध्ये केलेली दरवाढ यावर सभेत चर्चा करून व्यावसायिक जाहिरात फलकांच्या जाहिरातीचे सुधारित किमान व कमाल दर निश्चित करण्यात आले.
सभेस संध्या बस्ते, नंदन दीक्षित, मच्छिंद्र देशमुख, गणेश बोडके, विष्णुपंत पवार, सोमनाथ पाटील, रमेश गिते, विराज पवार, बंटी धनविजय, छोटू धनविजय, अनुप वझरे, निलेश विसपुते, दीपक पवार, प्रविण खैरे, सुरेश सोळंके, विराज पवार, निखिल सुराणा, रोहन सुराणा, संजय मालुसरे, संजय अस्वले व नोवाचे सर्व सदस्य उपस्थित होते.
हेही वाचा :
- ‘रत्नदीप’चे डॉ. मोरेंविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा ; गुन्हा दाखल होताच मोरे पसार
- शाळा विकासाचा ‘बीओटी’ पॅटर्न राज्यात राबविणार : शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर
- दहावी-बारावी प्रमाणपत्रांची सुरक्षा ऐरणीवर ! बोगस प्रमाणपत्रे वाटणारी टोळी पुण्यात पकडली
The post नाशिक : ‘नोवा’च्या अध्यक्षपदी विक्रम कदम, तर सरचिटणीसपदी सचिन गिते appeared first on पुढारी.