Site icon

नाशिक : पंचवटीतून एक टन कचर्‍याचे संकलन

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मनपाच्या वतीने रामकुंड येथे विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यात सुमारे एक टन घनकचरा संकलित करून पाथर्डीस्थित खतप्रकल्पावर रवाना करण्यात आला. अमृत महोत्सवनिमित्त इंडियन स्वच्छता लिग या शासनाच्या उपक्रमांतर्गत मनपाने ‘नाशिक झिलर्स’ या संघासह सहभाग घेतला. राष्ट्रपिता महात्मा गांधी स्मारकास वंदन करून मोहिमेला सुरुवात झाली.

मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या आदेशाने आणि घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉ. आवेश पलोड यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी विभागीय अधिकारी कैलास राभडिया, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे यांच्या उपस्थितीत पंचवटीतील स्वातंत्र्यसैनिक रामभाऊ गणपत इंगळे चौक, तारवाला सिग्नल येथे स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. तारवाला सिग्नल परिसर, पेठ रोड पाट, गणेशवाडी, अमरधाम आतील आणि बाहेरील परिसरात स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेत हर्षल इंगळे मित्र परिवार यांच्या 10 स्वयंसेवक यांनी मोहिमेत सहभाग घेतला. त्यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच पेठ रोड पाट परिसरातील गोठेधारकांना गुलाबपुष्प देऊन गोठे आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रबोधन करण्यात आले. या मोहिमेत स्वछता निरीक्षक दुर्गादास मालेकर, दीपक चव्हाण, किरण मारू, उदय वसावे, विनय रेवर मुकादम, शिवाजी सूर्यवंशी, संजय पडाया, संजय मकवाना, दिनेश सोलंकी, नरेश नागपुरे, विलास साळवे, अनिल नीलकंठ, बालू जगताप, विजय जाधव, संजय पवार, नंदू गवळी, बी. के. पवार, ताराचंद काळे, चंद्रशेखर साबळे, राकेश साबळे, युवराज मकवाना, किशोर सालवे, अनिल नेटावटे आणि 103 स्वच्छता कर्मचारी, वॉटरग्रेसचे नाईकवाडे, कृष्णा शिंदे आणि त्यांचे 40 कर्मचारी उपस्थित होते.

कचरा वर्गीकरणाचे धडे
या मोहिमेदरम्यान कचरा उघड्यावर न टाकता वर्गीकरण करूनच घंटागाडीत देणे, प्लास्टिक कॅरिबॅग न वापरता कापडी पिशवीचा वापर करणे, सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान न करणे, घरोघरचा ओला, सुका आणि घातक कचरा वर्गीकरण करणे इत्यादीबाबत जनजागृती करण्यात आली.

हेही वाचा:

The post नाशिक : पंचवटीतून एक टन कचर्‍याचे संकलन appeared first on पुढारी.

Exit mobile version