नाशिक : पंचवटीत अवैध गॅस भरणा केंद्रावर छापा

नाशिक : अवैध गॅस भरणा ,www.pudhari.news

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

पंचवटीतील राजवाडा परिसरात अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीमध्ये अवैध पद्धतीने गॅस भरणा केंद्रावर पंचवटी पोलिसांनी छापा टाकला. यात एक रिक्षा, तीन गॅसटाक्या, दोन मोटर, दोन इलेक्ट्रॉनिक काटे जप्त करण्यात आले असून, पुढील तपास पंचवटी पोलिस ठाणे करीत आहे.

निमाणी बसस्थानकासमोरील राजवाडा या ठिकाणी अवैध गॅस भरणा केंद्र सुरू असल्याची खबर पंचवटी गुन्हे शोध पथकास मिळाली होती. पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी छापा टाकला असता संशयित सुनील बरे, जीवन शेजवळ हे गॅस भरताना आढळले. त्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून रिक्षासह गॅसच्या टाक्या, मोटर आदी साहित्य जप्त करण्यात आले. या अवैध केंद्राच्या आजूबाजूस लोकवस्ती असून शाळा, कॉलेज, हॉस्पिटल आहेत. टाकीचा स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडू शकते. या प्रकरणी कडक कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे.

अवैधपणे घरगुती गॅस भरणारी ठिकाणे
कर्णनगर आरटीओ ऑफिस, निलगिरी बाग, के. के. वाघ कॉलेजमागे, स्वामी नारायण शाळेजवळ आडगाव नाका, चिंचवन मालेगाव स्टॅण्ड, मोरे मळा, तपोवन परिसर, मेडिकल कॉलेज चौफुली, वज्रेश्वरी झोपडपट्टीमागील भाग, तवली फाटा, विडी कामगारनगर.

हेही वाचा :

The post नाशिक : पंचवटीत अवैध गॅस भरणा केंद्रावर छापा appeared first on पुढारी.