नाशिक : पंचवटीत गळतीमुळे पाणीपुरवठा दोन दिवस खंडीत

पाणी पुरवठा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पंचवटी विभागातील पेठरोड, गंगापूर डावा तट कालव्याजवळ दुर्गानगर आणि मखमलाबाद जलकुंभास पाणी पुरवठा करणाऱ्या उर्ध्ववाहिनीला गळती लागल्याने पंचवटी विभागातील प्रभाग क्रमांक १, ४ व ६ मधील पाणीपुरवठा दोन दिवस खंडीत राहणार आहे. जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने गुरूवारी (दि.१२) प्रभाग १ व ६ मधील परिसरात दुपारी व सायंकाळी तर शुक्रवारी (दि.१३) सकाळचा पाणी पुरवठा बंद राहील. दुरूस्तीच्या कामामुळे दुर्गानगर व मखमलाबाद जलकुंभावरुन प्रभाग क्र. १ आणि प्रभाग क्रमांक ६ मध्ये होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे.

प्रभाग क्र. १ मधील शिवतेज नगर (पै.), श्रीधर कॉलनी (पै) तसेच प्रभाग क्रमांक ६ मधील चांदशीरोड, गंगावाडी रोड, फडोळ मळा, रामकृष्ण नगर, पिंगळे नगर, एरिकेशन कॉलनी, मानकर नगर, महालक्ष्मी नगर, स्वामी विवेकानंद नगर, मानकर मळा, तवली डोंगर परिसर, कल्याणी व राजेय सोसायटी, मेहेरधाम, गॅस गोडावून, यशोदानगर, पेठरोड या परिसरात गुरूवारी (दि.१२) दुपारचा आणि सायंकाळचा पाणीपुरवठा खंडीत राहणार आहे.

तसेच प्रभाग क्र. १ मधील दुर्गानगर, शिवसमर्थ नगर, जुई नगर, ओंकार बंगला परिसर शिवतेज नगर (पै.), श्रीधर कॉलनी (पै.) व प्रभाग क्रमांक ४ मधील कॅन्सर हॉस्पिटल मागील परिसर, अनुसयानगर, कर्णनगर, समर्थनगर तुळजाभवानी नगर, हमालवाडी परिसर, पवार मळा परिसर.

प्रभाग क्रमांक ६ मधील मखमलाबाद गांव, मखमलाबाद रोड पश्चिम भाग, मातोश्री नगर, विद्या नगर, वडजाई माता नगर, महादेव कॉलनी, कोळी वाडा, घाडगे नगर, एरिकेशन कॉलनी (पै.), मानकर नगर (पै.), जयमल्हार कॉलनी, अश्वमेघ नगर, सप्तरंग सोसायटी या परिसरात शुक्रवारी (दि.१३) सकाळचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश निकम यांनी केले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : पंचवटीत गळतीमुळे पाणीपुरवठा दोन दिवस खंडीत appeared first on पुढारी.