
नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा
चिंचबन येथे डॉक्टरने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि. 5) सकाळी उघडकीस आली. नीलेशकुमार पोपटलाल छाजेड (48, रा. चिंचबन, पंचवटी) असे डॉक्टरचे नाव आहे. ते पंचवटीतील एका खासगी रुग्णालयात कार्यरत होते. डॉ. छाजेड यांनी सोमवारी (दि. 5) सकाळी साडेसातनंतर गळफास घेतल्याचे आढळून आले. घटना उघडकीस येताच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ. छाजेड यांचे गेल्या अनेक महिन्यांपासून कौटुंबिक वाद सुरू होते. त्यातून त्यांनी हे पाऊल उचलल्याचा संशय पंचवटी पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृत छाजेड यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. पंचवटी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, तपास केला जात आहे.
हेही वाचा :
- उद्योगजगताला हादरा
- दौंडमधील सर्वाधिक शाळाबाह्य मुले मुख्य प्रवाहात; कोरोनामुळे स्थलांतरित कुटुंबांची वाढली संख्या
The post नाशिक : पंचवटीत डॉक्टरची गळफास घेत आत्महत्या appeared first on पुढारी.