नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
घराबाहेर उभ्या केलेल्या चारचाकी वाहनांच्या काचांवर दगडफेक करून वाहनांचे नुकसान करण्यात आल्याची घटना घडली असून, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी दगडफेक करत वाहनांच्या काचा फोडल्या. पंचवटी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून अज्ञातांचा शोध सुरू केला आहे.
शिंदेनगर परिसरातील कॉलनी रस्त्यावर असलेल्या बालाजी हाइट्स येथे पहाटे ४ च्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये इनाेव्हा व सॅन्ट्राे कारच्या काचांवर दगडफेक करून ताेडफाेड करण्यात आली आहे. काचा फाेडल्याचा आवाज आल्याने परिसरातील नागरिकांनी घराबाहेर डाेकावून पाहिले असता तिघे जण दगड फेकून दुचाकीवरून पळून गेल्याचे बघितले असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. या घटनेत ॲड. देवदत्त जायखेडकर यांची कार तसेच अन्य एका कारची काच फोडण्यात आली. या प्रकरणी जायखेडकर (४०, रा. बालाजी हाइट्स, मखमलाबाद रोड) यांनी तक्रार दाखल केली.
हेही वाचा :
- कर्नलच्या ताब्यातील पिस्तुलासह 20 जिवंत काडतुसांची चोरी
- नाशिक : कुंभमेळ्यासाठी ७० कोटींचे इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर
- Terrorist Tahawwur Rana : अमेरिका दहशतवादी तहव्वूर राणाला भारताकडे सोपवणार? रिट याचिका फेटाळली
The post नाशिक : पंचवटीत दुचाकीवरून आलेल्या तिघांनी फोडल्या वाहनांच्या काचा appeared first on पुढारी.