नाशिक : पंढरीला जाऊ न शकल्याने गुरुपीठात आषाढीनिमित्त भविकांची मांदियाळी

गुरुपीठ, नाशिक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आषाढी एकादशीला जे भाविक, सेवेकरी, वारकरी विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरीला जाऊ शकले नाहीत, अशा हजारो भाविकांनी रविवारी (दि. 10) दिंडोरी, त्र्यंबकेश्वर गुरुपीठात एकादशी साजरी केली. दिवसभरात दिंडोरी आणि त्र्यंबकमध्ये हजारो भाविकांनी उपस्थिती लावून श्री स्वामी समर्थ महाराज आणि गुरुमाउलींच्या दर्शनाचा लाभ घेतला. या प्रसंगी चंद्रकांतदादा मोरे उपस्थित होते.

दिवसभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा भाविकांच्या उत्साहावर कुठलाही परिणाम झाला नाही. पावसाने सेवेकर्‍यांचा आनंद द्विगुणितच केला. सेवेकर्‍यांनी त्र्यंबकनगरीत स्वच्छता अभियान राबविले. सेवामार्गाच्या बालसंस्कार विभागाच्या माध्यमातून 2019 मध्ये 11 लाख वृक्षारोपण व 6 जून 2021 मध्ये लॉकडाउनच्या काळात विद्यार्थी व युवकांच्या माध्यमातून 6 लाख वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करण्यात येत आहे. आता 1 कोटी वृक्षलागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. आजपासून 30 सप्टेंबर 2025 पर्यंत भारतातील सेवा केंद्रे व बालसंस्कार विभागातील मुले, पालक व सेवेकरी हे 1 कोटी रोपांची लागवड करून त्यांचे संगोपन करणार आहेत.
भारतातील सर्व सेवा केंद्रांमध्ये हा उपक्रम जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर ह्या चार महिन्यांमध्ये होणार आहे. या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नितीन मोरे यांनी केले आहे. दि. 13 जुलै रोजी सेवामार्गाचा मुख्य गुरुपौर्णिमा उत्सव सर्व समर्थ केंद्रांमध्ये साजरा होणार असून, त्याची तयारी सुरू आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : पंढरीला जाऊ न शकल्याने गुरुपीठात आषाढीनिमित्त भविकांची मांदियाळी appeared first on पुढारी.