
नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील टेंभूरवाडी परिसरातील मोडकळीस आलेल्या पडीक कौलारू घराच्या पडवीत ठाण मांडून बसलेल्या जखमी अवस्थेतील नर जातीचा अडीच वर्षे वयाच्या बिबट्यास वनविभागाने जेरबंद करत उपचारासाठी मोहदरी येथील वनोद्यानात हलविले आहे.
टेंभूरवाडी येथील शेतकरी वाळिबा पाटोळे यांनी आपल्या गट नंबर 1533 मध्ये घर बांधलेले आहे. परंतु, त्या घरात कोणीही वास्तव्यास नाही. शनिवारी (दि.19) सकाळी 8 ला गोपी पाटोळे हा युवा शेतकरी आपली बैलजोडी घेऊन शेतात जात असताना त्याला बांधाच्या कडेला बिबट्या दिसला. गोपीची चाहूल लागताच बिबट्याने वाळिबा पाटोळे यांच्या मोडकळीस आलेल्या भिंतीवरून उडी मारली व घराच्या पडवीत लपून बसला. या घटनेची माहिती ग्रामस्थांनी वनविभागाला देताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. वनपरिक्षेत्र अधिकारी मनीषा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक येथील इको टीम यांच्या वतीने बिबट्याला थेट पकडण्याची मोहीम राबविण्यात आली. जाळीच्या सहाय्याने बिबट्याला पकडण्यात आले आणि त्याला तालुक्यातील मोहदरी येथील वनोद्यानात नेण्यात आले. या मोहिमेसाठी मनीषा जाधव, एस. एम. बोडके, किरण गोर्डे, पी. जी. बिन्नर, जी. के. पाटील, ए. टी. रुपवते आदींनी मोहीम फत्ते केली.
हेही वाचा:
- आ.छगन भुजबळ : एकात्मतेसाठी सामुदायिक विवाह सोहळे गरजेचे
- Bhagat Singh Koshyari : ‘एक स्वाभिमानी मिंधे सरकार’, राऊतांचा ट्विटरवरून शिंदे सरकारवर निशाणा
- गोव्यात आजपासून इफ्फी; रंगारंग कलाविष्कार
The post नाशिक : पडक्या घरातून डरकाळी जेरबंद appeared first on पुढारी.