नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा; घरात सातत्याने कौटुंबिक कारणावरून काहीनाकाही कुरापत काढून वारंवार विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करत असल्याने माहेरी गेलेली पहिली पत्नी हयात असताना देखील दुसरा विवाह केल्याने पहिल्या पत्नीने जीवन संपविल्याच घटना शुक्रवारी (दि. २०) सकाळी मखमलाबाद येथील रामकृष्ण नगर येथे घडली असुन संशयितांना तातडीने अटक करावी यासाठी नातेवाइकांनी आक्रोश करत जिल्हा रुग्णालयासमोर ठिय्या आंदोलन केले. मात्र सायंकाळी सहाय्यक पोलिस आयुक्त किरण चव्हाण यांच्या आश्वासनानंतर ते मागे घेण्यात आले. (Nashik News)
सविता सोमनाथ गरड (वय ३६) असे जीवन संपविणाऱ्या विवाहितेचे नाव असून सतरा वर्षांपूर्वी नांदूर निसर्ग नगर येथे राहणाऱ्या सोमनाथ अशोक गरड (३९) याच्या समवेत विवाह झाला होता. सोमनाथ व सवितास दोन अपत्ये आहे. संशयित आरोपी पती सोमनाथ याने दोन दिवसापूर्वी एका महिलेशी विवाह केला होता. पहिली पत्नी हयात असताना दुसरा विवाह कसा केला, याचा जाब विचारण्यासाठी सविता व तिचे कुटुंबीय सविताच्या निसर्ग नगर येथील सासरी गेले असताना पती तसेच सासूने मारहाण करून घराबाहेर हुसकावून दिले होते. मारहाणीच्या या प्रकारा विरोधात विवाहित आडगाव पोलिसात तक्रार करण्यासाठी गेल्यानंतर तेथील महिला पोलिस अधिकाऱ्याने तिला पिटाळून लावले. यानंतर माहेरी मखमलाबाद रोड येथे राहत होती. या प्रकारच्या नैराश्यातून घराला बाहेरून कडी लावून घेतली आणि ती इमारतीच्या छतावर गेली तिने लोखंडी शिडीला वायरने गळफास घेऊन जीवन संपविले. सकाळ असल्याने सविता हिची जाऊ घरात देवपूजा करत होती. त्यानंतर तिने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता सविता घरात नव्हती. घराचा दरवाजा बाहेरून बंद असल्याने शेजारच्या नागरिकांनी दरवाजाची कडी उघडली, त्यानंतर सविताचा भाऊ व नातेवाइकांनी तिचा शोध घेणे सुरु केले, मात्र सविता मिळून आली नाही. त्याच वेळी सविताने छतावर गळफास घेत जीवन संपविल्याचे नागरिकांच्या लक्षात आले व त्यांनी तिच्या कुटुंबीयांना माहिती दिली.
पंधरा दिवसांपूर्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मयत सविता हिचा पती सोमनाथ तसेच सासू, सासरे य दीर शारीरिक व मानसिक छळ करत असल्याचाच पंधरा दिवसापूर्वी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर यापूर्वी पती त्रास देत असल्याने स्वतः सविता हिने देखील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. असे तिच्या नातेवाइकानी सांगितले.
सविता व सोमनाथ यांच्यात सतत वाद
घरात पैसे देत नव्हता यावरून पती-पत्नीत वाद व्हायचे, त्यामुळे काही दिवसांपासून सविता मखमलाबाद रामकृष्णनगर गुरुदत अपार्टमेंट येथे राहणाया आईकडे माहेरी आलेली होती. गेल्या बुधवारी (दि. १८) पती सोमनाथ याने परजिल्ह्यात राहणाचा एका दुसऱ्या महिलेशी दुसरा विवाह केल्याची कुणकुण सविताला लागल्याने सविता व तिचे कुटुंबीय दुसरा विवाह का केला, हे विचारण्यासाठी निसर्ग नगरला गेले असता पतीसह सासूने सविताला शिवीगाळ करत बेदम मारहाण करून घरातून हुसकावून दिले होते. शुक्रवारी सकाळी सविता हिने पतीने दुसरा विवाह केला.
हेही वाचा :
- Pune News : अनधिकृत प्रवेश देणार्या संस्थांवर गुन्हे दाखल करणार
- ब्रिटनमध्ये 500 कोटींचा रिंगरूट बनला ‘घोस्ट जंक्शन’!
The post नाशिक : पतीने दुसरा विवाह केल्याने पत्नीने संपविले जीवन appeared first on पुढारी.