नाशिक : पत्नीच्या खुनाच्या गुन्ह्यातून दोषमुक्तीचा निकाल ठरला औटघटकेचा, सहा दिवसांनीच झाला मृत्यू

न्यायालय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पत्नीचा खून केल्याप्रकरणी मध्यवर्ती कारागृहात असताना छातीत दुखत असल्याने एका वृद्धास रुग्णालयात दाखल केले. तर दुसरीकडे न्यायालयाने खुनाच्या गुन्ह्यात संशयितास दोषमुक्त केले. मात्र, निकालाचा आनंद औटघटकेचा ठरला आणि संशयिताचा सहा दिवसांनी उपचारादरम्यान मृत्यू झाला.

नामदेव राजाराम भोर (रा. विंचूरदळवी, भोरमळा, सिन्नर) असे या वृद्धाचे नाव आहे. नामदेव भोर यांच्यावर 23 सप्टेंबर 2019 रोजी पत्नी हिराबाई यांचा खून केल्याप्रकरणी आरोप होता. या प्रकरणी सिन्नर पोलिस ठाण्यात नामदेव भोर यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर ते नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात होते. दरम्यान, 14 ऑगस्ट 2022 रोजी रात्री त्यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली. त्यानुसार कारागृह प्रशासनाने त्यांना तातडीने 15 ऑगस्टला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तर दुसरीकडे 16 ऑगस्टला न्यायालयाने दिलेल्या निकालात नामदेव भोर यांना दोषमुक्त केले. त्यामुळे तुरुंग प्रशासनानेही त्यांचा ताबा नातलगांकडे सोपवला होता.

The post नाशिक : पत्नीच्या खुनाच्या गुन्ह्यातून दोषमुक्तीचा निकाल ठरला औटघटकेचा, सहा दिवसांनीच झाला मृत्यू appeared first on पुढारी.