Site icon

नाशिक : पत्रकार संघाचा कार्यगौरव पुरस्कार जाहीर; दै. ‘पुढारी’चे जिजा दवंडे यांचा समावेश

नाशिक (देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा
अ. भा. मराठी पत्रकार परिषद, (मुंबई) संलग्न नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाचा कार्यगौरव पुरस्कार दै. ‘पुढारी’चे उपसंपादक जिजा दवंडे यांना जाहीर झाला आहे. दवंडे यांच्यासह प्रिंट, इलेक्ट्रॉनिक मीडिया, कला, क्रीडा, कृषी, धार्मिक, शैक्षणिक, वृत्तपत्र विक्रेते, उद्योजक, सामाजिक संस्था आदींसह 38 जणांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती तालुका अध्यक्ष सुधाकर गोडसे यांनी दिली. येथील डॉ. गुजर सुभाष हायस्कूलच्या सभागृहात शुक्रवारी (दि. 6) सकाळी 11 ला पत्रकारिता पुरस्काराचे वितरण होणार आहे. अध्यक्षस्थानी माजी मंत्री बबन घोलप, तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार हेमंत गोडसे, आ. सरोज आहिरे, कॅन्टोन्मेंट सदस्य प्रीतम आढाव, रतन चावला यांच्यासह विविध दैनिकांचे संपादक उपस्थित राहणार आहेत.

पुरस्कारार्थी असे… : प्रिंट मीडियासाठी जिजा दवंडे, उमेश परिपूर्ण, अशोक निसाळ, दिलीप सूर्यवंशी, दत्ता जाधव, विलास भालेराव, महेश गायकवाड, अशोक गवळी, प्रशांत निरंतर, श्रीधर गायधनी, राजेंद्र सूर्यवंशी, नीलेश अलई, सुशील भागवत, गुलाब ताकाटे, करण बिडवे, प्रवीण गोसावी. तर इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी कल्पेश लचके, जितेंद्र नरवडे, भैयासाहेब कटारे, वृत्तपत्र विक्रेते नीलेश हासे, विक्रम कडाळे, प्रा. संगीता पवार, प्रशांत दाते व शिंदे, सुनील भिसे, कैलास भोर, संजय कल्याणी, शुभम तागड, अमोल गायधनी, संजय पेखळे, तन्वी लखवानी, शिवा आडके, बबनराव कांगणे, सुमित्रा पाटोळे आदींसह जगदंबा माता ट्रस्ट आदींचा गौरव केला जाणार आहे. याप्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थापक अध्यक्ष मोतीराम पिंगळे, अध्यक्ष सुधाकर गोडसे, कार्याध्यक्ष सुनील पवार, सरचिटणीस अरुण बिडवे, सर्व पदाधिकारी व सदस्य आदींनी केले आहे.

The post नाशिक : पत्रकार संघाचा कार्यगौरव पुरस्कार जाहीर; दै. ‘पुढारी’चे जिजा दवंडे यांचा समावेश appeared first on पुढारी.

Exit mobile version