नाशिक पदवीधरसाठी शुंभागी पाटील यांना ठाकरे गटाचा पाठिंबा, कोण आहेत शुंभागी पाटील ?

शुंभागी पाटील

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क 

नाशिक पदवीधर निवडणुकीतील अपक्ष उमेदवार शुंभागी पाटील यांना शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. शुभांगी पाटील या ठाकरे गटाच्या उमेदवार असणार आहेत. अशी माहिती नाशिक शिवसेनेचे उपनेते सुनिल बागुल यांनी दिली आहे. बागुल हे माध्यमांशी बोलत होते.

नाशिक पदवीधर निवडणुकीची जबाबदारी आमच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यासाठी आम्ही शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला असल्याचे सुनिल बागुल यांनी सांगितले. मुंबई येथे मातोश्रीवर शिवसेनेची आज बैठक पार पडली.  या बैठकीत हा निर्णय झाल्याचे सुनिल बागुल यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात अधिकृत घोषणा केली नसली तरी शुंभागी पाटील यांना शिवसेनेने पाठिंबा दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

निवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही अशी भूमिका संजय राऊत यांनी घेतली होती. त्यानंतर शुंभागी पाटील यादेखील मातोश्रीवर आजच्या बैठकीसाठी गेल्या होत्या. मी 10 वर्ष आंदोलने केली आहे. तळागाळातील लोकांसाठी मी काम केलं आहे. पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील तो मान्य राहील. आपल्याला पाठिंबा देण्यासंदर्भात चर्चा झाली आहे अशी माहिती शुंभागी पाटील यांनी माध्यमांना दिली.

राजाचा मुलगा राजा बनणार नाही, ज्यामध्ये कसब आहे तोच राजा बनणार असे बंडाचे निशाण फडकविणा-या शुंभागी पाटील यांना अखेर ठाकरे गटाने पाठिंबा दिला आहे.

कोण आहेत शुंभागी पाटील?

शिक्षण- बीए.डीएड, एम. ए बी. एड. एल. एल बी

नोकरी-शिक्षिका भास्कराचार्य संशोधन संस्था, धुळे

संस्थापक – महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन आणि महाराष्ट्र स्टुडंट्स असोसिएशन

प्रमुख सल्लागार महाराष्ट्र नर्सिंग अॅंड पॅरामेडिकल एम्प्लॉईज असोसिएशन

सचिव- ग्रामविकास मंडळ, मोलगी जिल्हा नंदुरबार

अध्यक्ष- गोपाल बहुउद्देशीय संस्था, जळगाव. युनिव्हर्सल एज्युकेशन सोसायटी धुळे

The post नाशिक पदवीधरसाठी शुंभागी पाटील यांना ठाकरे गटाचा पाठिंबा, कोण आहेत शुंभागी पाटील ? appeared first on पुढारी.