नाशिक पदवीधर निवडणुकीत नवा ट्विस्ट, शुभांगी पाटील नॉट रिचेबल

शुभांगी पाटील

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीवर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.  आज (दि.१६) अर्ज माघारीची अंतिम मुदत आहे. अशातच आणखी नवा ट्विस्ट समोर आला आहे. अपक्ष उमेदवार असलेल्या शुभांगी पाटील या सकाळपासून नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचा फोन बंद आहे. त्यांच्याशी संपर्क व्हावा यासाठी प्रयत्न सुरु आहे. पाटील या नक्की नाशिकमध्ये आहेत की मुंबईत असाही संभ्रम आहे. सकाळपासून शुभांगी पाटील नॉट रिचेबल असल्याने चर्चांना उधाण आले आहे.

तर दुसरीकडे सुभाष जंगले यांनी मीच मविआचा उमेदवार असल्याचा दावा केला आहे. उद्धव ठाकरे यांनी शुभांगी पाटील यांना कोणताही शब्द दिला नसल्याचे जंगले यांनी म्हटले आहे. तर, धनराज विसपुते यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. भारतीय जनता पार्टीने मला पाठिंबा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे  भाजपचा उमेदवार कोण असेल? शुभांगी पाटील, धनराज विसपुते की सत्यजित तांबे असा प्रश्न निर्माण झाला असतानाच गिरीश महाजन यांनी शुभांगी पाटील यांना पक्षप्रवेशावेळी कोणताही शब्द भाजपने दिला नव्हता असे स्पष्ट केले आहे. महाजन हे नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत. निवडणुकीत आतापर्यंत चार जणांनी माघार घेतली आहे. तीन वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक पदवीधर निवडणुकीत नवा ट्विस्ट, शुभांगी पाटील नॉट रिचेबल appeared first on पुढारी.