नाशिक पदवीधर निवडणूक : अखेरच्या क्षणी मोठा ट्विस्ट, सुधीर तांबेंनी अर्ज भरलाच नाही

सत्यजीत तांबे, www.pudhari.news

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क 

महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीत कॉंग्रेसक़डून डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र आज गुरुवार (दि. 12) निवडणूक अर्ज दाखल करण्याची अखेरची मुदत असताना या निवडणूकीत मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. सुधीर तांबे यांनी मागार घेत उमेदवारी अर्जच भरला नाही. मात्र, त्यांचे पूत्र सत्यजीत तांबे हे ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार आहे. सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

सुधीर तांबे यांनी स्वत: यासंदर्भात माहिती दिली आहे. कॉंग्रेसकडून वेळेत एबी फॉर्म न मिळाल्याने सत्यजीत तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. अपक्ष म्हणून निवडणूक लढणार असलो तरी उमेदवार आपण कॉंग्रेसचेच असणार आहोत अशी माहिती सत्यजीत तांबे यांनी दिली आहे.

यावेळी सुधीर तांबे म्हणाले, मी कॉग्रेसकडून ३ वेळेस निवडून आलो. गेल्यावेळी अपक्ष होतो. तब्बल 13 वर्ष काम केले. या काळात मतदारसंघाला वेगळा आयाम दिला. तरूणांना संधी देण्याचे काम कॉग्रेसने नेहमीच केले आहे. शेवटच्या क्षणापासून चर्चा सूुरू होती. एबी फॉर्म माझ्या नावाने आला. पण येथे पक्षाचे चिन्ह नसते. पक्षाच्या पलीकडे जाऊन विचार करणे गरजेचे आहे. तरुण नेतृत्वाला संधी द्यायचा विचार होता. त्यामुळे सत्यजीतला संधी दिली आहे. सर्व पक्ष सत्यजीत ला मदत करतील अशी प्रतिक्रीया तांबे यांनी दिली.

म्हणून अपक्ष लढावे लागणार-  सत्यजित तांबे

कॉग्रेसमधील अनेक वरीष्ठांची मर्जी होती की मी उमेदवारी करावी. मी दोन फॉर्म भरले होते. वेळेवर एबी फॉम आला नाही म्हणू अपक्ष लढावे लागणार आहे. अपक्ष लढत असलो तरी मी कॉंग्रसचा उमेदवार असणार आहे. तसेच सर्व पक्षांना मदतीसाठी विनंती करणार आहे. मनसे, रासप, भाजपला पाठिंब्यासाठी विनंती करणार आहे. देवेंद्र फडणवीस व चंद्रशेखर बावनकुळे यांनाही मदतीसाठी विनंती करणार असल्याचे सत्यजित तांबे यांनी सांगितले.

तर पाठिंबा देऊ – राधाकृष्ण विखे-पाटील, महसुलमंत्री.

पक्ष देतील त्या उमेदवाराचे काम करावे लागते. बरेच लाेक इच्छूक आहे. उद्यापर्यंत निर्णय होणे अपेक्षित आहे. काेण उभे आहेत ते पाहावे लागेल. सत्यजितचे माझे काही बोलणे झाले नाही. पक्षाने त्यांना उमेदवारी दिली तर
त्यांना पाठिंबा देऊ.

The post नाशिक पदवीधर निवडणूक : अखेरच्या क्षणी मोठा ट्विस्ट, सुधीर तांबेंनी अर्ज भरलाच नाही appeared first on पुढारी.