
नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क
महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी कॉंग्रेसकडून डॉ. सुधीर तांबे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ते आज गुरुवारी (दि. १२) आपला उमेदवारी अर्ज कॉंग्रेसचे नेते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दाखल करणार असल्याची माहिती आहे.
आज (दि. १२) निवडणूक अर्ज दाखल करण्याची अखेरची मुदत असल्याने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तसेच भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे. या निवडणुकीसाठी ५ जानेवारी रोजी निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध झाली होती. अर्ज दाखल करायची अंतिम मुदत १२ जानेवारी आहे. दाखल अर्जांची छाननी १३ जानेवारीला होणार आहे. माघारीसाठी १६ जानेवारी अंतिम मुदत आहे, तर ३० जानेवारीला सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार आहे. मतमोजणी २ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
हेही वाचा :
- नगर : चांद्याकडे येणारे चारही जोडरस्ते खराब ; बस बंद; विद्यार्थ्यांचे नुकसान, व्यवसायांवर परिणाम
- पुणे : कांदा, लसूण प्रक्रिया उद्योगासाठी मदत
- नाशिक : विज्ञान प्रदर्शनात आदिवासी विद्यार्थ्यांचा आविष्कार
The post नाशिक पदवीधर निवडणूक : कॉंग्रेसकडून सुधीर तांबेना उमेदवारी जाहीर appeared first on पुढारी.