Site icon

नाशिक पदवीधर निवडणूक ; मतदानाचे सूक्ष्म नियोजन करा : राधाकृष्ण गमे

धुळे; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी 30 जानेवारीरोजी धुळे जिल्ह्यातील 29 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीचे सूक्ष्म नियोजन करावे. या कालावधीत आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश नाशिक विभागाचे विभागीय महसुल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले. आयुक्त गमे आज (दि.१८) धुळे जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात निवडणुकीशी संबंधित बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस जिल्हाधिकारी जलज शर्मा, महापालिका आयुक्त देविदास टेकाळे, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी तृप्ती धोडमिसे, सहायक जिल्हाधिकारी सत्यम गांधी, अतिरिक्त पोलीस अधिक्षक किशोर काळे आदी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त गमे म्हणाले की, या निवडणुकीच्या कालावधीत आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन होईल, टपाली मतदानाची व्यवस्था करावी. मतदान केंद्रावर व्हीडीओ कॉस्टींगची व्यवस्था करावी, पोलीस बंदोबस्तासाठी पुरेसा संख्याबळ तयार ठेवावे, मतदान केंद्रांवर मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. मतदान केंद्रांवरील दळण- वळण सुविधांचा आढावा घ्यावा. मतदान झाल्यानंतर मतमोजणीची प्रक्रिया समजून घ्यावी. त्यासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रशिक्षण वर्ग आयोजित करावा.

मतदान व मतमोजणीसाठी सूक्ष्म निरीक्षक नियुक्त करावेत. त्यांचेही प्रशिक्षण घ्यावे. मतपेटय़ा तपासून घ्याव्यात. मतदान साहित्य ताब्यात देतांना आवश्यक ती काळजी घ्यावी. सर्व नोडल अधिकारी यांनी त्यांचेवर सोपविलेली जबाबदारीचे तंतोतंत पालन करावे, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांवर आवश्यक ती दक्षता घेण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

हेही वाचलंत का ? 

The post नाशिक पदवीधर निवडणूक ; मतदानाचे सूक्ष्म नियोजन करा : राधाकृष्ण गमे appeared first on पुढारी.

Exit mobile version