Site icon

नाशिक : पदवीधर मतदार नोंदणीचा टक्का घसरला, अवघे ‘इतके’ मतदार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पदवीधर मतदारसंघाचा बिगुल वाजला असताना, यंदाच्या वर्षी नाशिक जिल्ह्यात मतदारांचा टक्का घसरला आहे. जिल्ह्यातून अवघी ६६ हजार ७०९ पदवीधर मतदारांची नोंदणी झाली आहे. २०१७ च्या तुलनेत तब्बल ३० हजारांनी मतदारसंख्या घटली आहे. दरम्यान, प्रशासनाने जिल्ह्यात ९९ मतदान केंद्रे निश्चित केली आहेत.

नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी ३० जानेवारीला मतदान होत आहे. विभागातील पाचही जिल्ह्यांमधून त्यासाठी मतदार नोंदणीची प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र, २०१७ च्या तुलनेत यंदा नाशिक जिल्ह्यात मतदार नोंदणीचा टक्का घसरला आहे. 15 ही तालुक्यांमधून अवघी ६६ हजार ७०९ मतदारांची नोंद झाली आहे. मतदार नोंदणीसाठी जिल्हा निवडणूक शाखेकडून जनजागृतीवर भर देत, 15 ही तालुक्यांत विविध प्रकारचे कार्यक्रम राबविण्यात आले. मात्र, नोंदणीची प्रक्रिया किचकट असल्याने पदवीधरांनी त्याकडे पाठ फिरविली.

नाशिक शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघ मिळून एकूण २२ हजार ४०९ मतदारांची नोंदणी झाली आहे. त्याखालोखाल चांदवडला ६ हजार ७९५, तर त्र्यंबकेश्वरमध्ये सर्वात कमी म्हणजे केवळ ६६३ पदवीधरांनी नोंदणी केली आहे. दरम्यान, निवडणूक शाखेकडून जिल्हाभरात ९९ मतदान केंद्रांची यादी तयार करण्यात आली आहे. नाशिक शहरात ३० केंद्रे असणार असून, निफाड, सिन्नर, बागलाणमध्ये प्रत्येकी ९ केंद्रे असतील, तर त्र्यंबकेश्वर आणि पेठला सर्वात कमी म्हणजे दोन केंद्रे असणार आहेत.

तालुकानिहाय मतदारसंख्या

नाशिक : २२,४०९, सुरगाणा : १,१५०, कळवण : २,०७९, देवळा : २,३८७, बागलाण : ५,२८५, मालेगाव : ५,३०९, नांदगाव : २,२१०, येवला : २,७८१, चांदवड : २,६९६, निफाड : ६,७९५, दिंडोरी : ३,३८३, पेठ : ७१४, त्र्यंबकेश्वर : ६६३, इगतपुरी : २,२७१, सिन्नर : ६,५७७, एकूण : ६६,७०९.

हेही वाचा :

The post नाशिक : पदवीधर मतदार नोंदणीचा टक्का घसरला, अवघे 'इतके' मतदार appeared first on पुढारी.

Exit mobile version