नाशिक : पन्नास हजार रुपयांच्या कॉईलची चोरी

कॉईल चोरी www.pudhari.news

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील जैतापूर येथील गोंगलु प्रा. लिमिटेड कंपनीतील सबस्टेशन मधील ट्रान्सफार्मरच्या जवळपास ५० हजार रुपये किंमतीच्या २०० किलोग्रॅम वजनाच्या कॉपरच्या कॉईल चोरट्यांनी चोरून नेल्या. या घटनेबाबत अशोक बबनराव निकम यांनी फिर्याद दिल्याने  चोरट्याविरोधात वडनेरभैरव पोलीसात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील जैतापूर येथील गोंगलू कंपनीतील पॅनल रूम इंगारोजे व सिमेन्स कंपनीचे १२५ एम.सी.बीचा ट्रान्सफार्मर आहे. या ट्रान्सफार्मरच्या वायरी तोडून अज्ञात चोरट्यांनी त्यातील ५० हजार रुपये किंमतीच्या २०० किलोग्रॅम वजनाच्या कॉपर कॉईल चोरून नेल्या. या घटनेबाबत अशोक निकम यांनी पोलिसात फिर्याद दिल्याने चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : पन्नास हजार रुपयांच्या कॉईलची चोरी appeared first on पुढारी.