नाशिक परिमंडळात पाच लाख ग्राहकांचा ११७ कोटींचा ऑनलाइन भरणा 

नाशिक : ग्राहकांना घरबसल्या वीजबिल भरण्याची ऑनलाइन सोय उपलब्ध झाल्याने महावितरणचे राज्यात ६५ लाख वीजग्राहक दरमहा सरासरी एक हजार ४१६ कोटी रुपयांच्या वीजबिलांचा ऑनलाइन भरणा करतात. यात 
नाशिक तीन लाख ३८ हजार ग्राहकांनी ७० कोटी, मालेगाव मंडळात ४९ हजार ग्राहकांनी आठ कोटी ३८ लाख, तर नगर मंडळात एक लाख ९९ हजार ग्राहकांनी ३८ कोटी ६३ लाखांचा अशाप्रकारे नाशिक परिमंडळात एकूण पाच लाख ८७ हजार ग्राहकांनी ११७ कोटी ६८ लाखांचा भरणा केला आहे.

महावितरणची वेबसाईट व मोबाईल ॲपसह विविध ऑनलाइन पर्यायांद्वारे ऑनलाइन वीजबिल भरणा क्रेडिट कार्ड वगळता निःशुल्क आहे. कोरोना काळात रांगेत उभे राहणे किंवा गर्दी टाळून घरबसल्या ऑनलाइन वीजबिल भरण्याची वीजग्राहकांना सोय आहे. 

हेही वाचा > दुसऱ्या लाटेत कोरोनाने बालकांना घेरले! हृदय, मेंदूवर आघात होत असल्याची बाब उघड

ऑनलाइन बिल भरण्यासाठी सूट

वीज ग्राहकांसाठी ऑनलाइन बिल भरण्यासाठी दरमहा ५०० रुपयांच्या मर्यादेत ०.२५ टक्के सूट आहे. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, यूयूपीआय, भीम, इंटरनेट बँकिंग, मोबाईल वॉलेट, मोबाईल बॅकिंगद्वारे वीजबिल भरणा केल्यास वीज देयकात ०.२५ टक्के सूट आहे. यापूर्वी नेटबँकिंगचा अपवाद वगळता वीजबिलांचा ऑनलाइन भरणा करण्यासाठी ५०० रुपयांपेक्षा अधिक रकमेवर शुल्क आकारण्यात येत होते. परंतु क्रेडिट कार्ड वगळता नेट बँकिंग, डेबिट कार्ड, कॅशकार्ड, यूपीआय, डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून ऑनलाइनने होणारा वीजबिल भरणा शुल्क आहे. ऑनलाइनद्वारे वीजबिल भरणा केल्यानंतर लगेचच ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे पोच देण्यात येत आहे. दहा हजारांपेक्षा अधिक बिलासाठी ‘आरटीजीएस’ किंवा ‘एनईएफटी’द्वारे थेट वीजबिल भरण्याची सोय आहे. 

हेही वाचा > भुजबळांची बिअर बारमध्ये धाड! बिल न देताच मद्यपींचा पोबारा; दिवसभर चर्चेला उधाण 

सद्यःस्थितीत 

विभाग ग्राहक संख्या भरणा 
कळवण ९ हजार १५८ १ कोटी ६२ लाख, 
मालेगाव १० हजार ६२८ २ कोटी २ लाख, 
मनमाड १९ हजार ३६९ ३ कोटी २० लाख 
सटाणा १० हजार २८४ १ कोटी ५२ लाख 
मालेगाव मंडळ ४९ हजार ४३९ ८ कोटी ३८ लाख 
चांदवड विभाग २४ हजार ५२० ४ कोटी ५२ लाख, 
नाशिक ग्रामीण ५४ हजार ३७९ ११ कोटी ७३ लाख, 
नाशिक शहर १ ९१ हजार ७१९ २८ कोटी ३ लाख 
नाशिक शहर २ १ लाख ६७ हजार ८११ २६ कोटी ३७ लाख 
नाशिक मंडळ ३ लाख ३८ हजार ४२९ ७० कोटी ६६ लाख