नाशिक : पांगरी शिवारात भर दिवसा बिबट्याचा वावर; व्हिडिओ व्हायरल

सिन्नर; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील पांगरी शिवारात भर दिवसा बिबट्याचा वावर वाढला असून एका कुत्र्यावर हल्ला करून ठार केल्याने बिबट्याची परिसरात दहशत पसरली आहे.

बुधवारी दुपारच्या सुमारास शेतकरी आंनदा पगार यांच्या डाळिंब बागेत बिबट्याने पाळीव कुत्र्यावर हल्ला करून त्याला ठार केले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भितीच वातावरण निर्माण झाले आहे. सायंकाळच्या सुमारास पुन्हा याच भागात बिबट्याने एका कुत्र्यावर हल्ला केला. दिवसा ढवळ्या शेतातून पलायन करणाऱ्या बिबट्याचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. बाबासाहेब शिंदे, आंनदा पगार यांनी वनविभागाकडे पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

The post नाशिक : पांगरी शिवारात भर दिवसा बिबट्याचा वावर; व्हिडिओ व्हायरल appeared first on पुढारी.