नाशिक : पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्याला पाेलिस कोठडी

पोलिस कोठडी,www.pudhari.news

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा 

स्वातंत्रदिनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या संशयित आरोपीला गुरुवारी (दि. १७) चांदवड न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश पी. बी. जोशी यांनी एक दिवसाची पाेलिस कोठडी सुनावली.

चांदवड येथील मंगरूळ सोमा टोल प्लाझा येथे ध्वजारोहण सुरू असताना एका २५ वर्षीय टोल कर्मचाऱ्याने पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या होत्या. या घटनेबाबत त्याच्याविरोधात चांदवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात येऊन अटक करण्यात आली होती. या घटनेमुळे चांदवड शहरातील हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्रितपणे पाेलिस ठाण्यावर मोर्चा काढत संशयितावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती. संबंधित आरोपीला चांदवड पोलिसांनी चांदवड न्यायालयात हजर केले असता, त्याला एक दिवसाची पाेलिस कोठडी सुनावण्यात आली. प्रभारी पाेलिस उपअधीक्षक सविता गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पाेलिस निरीक्षक रवींद्र जाधव अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्याला पाेलिस कोठडी appeared first on पुढारी.