नाशिक : पाच जिल्ह्यांमधून साडेसोळा कोटींचे अमलीपदार्थ जप्त

धुळे, पुढारी वृत्तसेवा : नाशिक परिक्षेत्रामध्ये प्रत्येक जिल्हा अमलीपदार्थ मुक्त करण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. दरम्‍यान, जिल्ह्यांमधून साडेसहा कोटींचा अमलीपदार्थ जप्त करण्यात आल्‍याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच महिलांसंदर्भातील गुन्हे आणि अर्ज निकाली काढण्यासाठी एक महिन्याचा विशेष ड्राईव्ह राबविण्यात येणार आहेत.

विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकाकडून धुळे जिल्ह्याची वार्षिक तपासणी गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सुरू आहे. त्यांनी धुळे जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांना भेटी दिल्‍या. तेथील गुन्हेगारीची व अन्य माहिती घेतली.

यावेळी माध्यमांशी बोलताना विशेष पोलीस महानिरीक्षक म्‍हणाले की, धुळे जिल्ह्यातील सर्व कामकाजाचा आढावा घेण्यात आला आहे. यात प्रलंबित गुन्हे आणि अर्ज यांना वेळेत आणि तातडीने न्याय दिल्यास सर्वसामान्य माणसाला त्याचा दिलासा मिळू शकतो. या हेतूने प्रलंबित गुन्हे आणि अर्ज निकाली काढण्याचे आदेश देण्यात आले आहे.

विशेषतः जनता आणि पोलीस यांच्यातला सुसंवाद कायम राहावा यासाठी देखील प्रयत्न केला जाणार आहे. जिल्ह्यातील पोलीस वसाहतीचा प्रश्न देखील मार्गी लावण्यात येणार असून या वसाहतींमधील सर्व कामे करण्यासाठीची कार्यवाही सुरू आहे. त्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

धुळे तालुक्यातील कावठी येथे मद्य कारखान्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने छापा टाकला होता. या कारखान्याचा मुख्य आरोपी दिनू गायकवाड हा फरार झाला आहे.

विभागात साडेसोळा कोटींचा अमलीपदार्थ जप्त

दरम्यान, नाशिक परिक्षेत्रातील सर्व पाच जिल्ह्यांमध्ये अमली पदार्थ विरोधी मोहीम अधिक तीव्र केली जाणार आहे. धुळे जिल्ह्यातील डोंगराळ भाग त्याचप्रमाणे नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील गांजा आणि अफूची लागवड करणारी शेती मोठ्या प्रमाणावर नष्ट करण्यात आली आहे. यासाठी ड्रोनची देखील मदत घेण्यात आली आहे. या पाचही जिल्ह्यांमधून पोलीस दलाने साडेसोळा कोटी रुपयांचे अमलीपदार्थ जप्त केले असून अनेक आरोपींना अटक केली आहे.

नाशिक विभागातील कोणतेही जिल्हे अमली पदार्थाच्या अधीन जाऊ नयेत यासाठी सर्व जिल्ह्यातील पोलीस प्रमुख आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आले आहेत, असे ते म्‍हणाले.

-हेही वाचा 

बीड : केजमध्ये भरदुपारी महिला नायब तहसीलदारांना मारण्याचा प्रयत्न!

संतापजनक; सामूहिक अत्याचारानंतर हत्या, हैवानांचा महिलेच्या मृतदेहावरही बलात्कार

नागपूर : महागाई, डॉ आंबेडेकर स्मारक प्रश्नी नागपुरात काँग्रेस आक्रमक

The post नाशिक : पाच जिल्ह्यांमधून साडेसोळा कोटींचे अमलीपदार्थ जप्त appeared first on पुढारी.