
नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा
बारा बंगला भागात मालेगाव युवा संघटनेने लक्षवेधी दहीहंडी उत्सव साजरा केला. ‘गोविंदा आला रे आला’, ‘बोल बजरंग बली के जय’च्या तालावर गोविंदापथके थिरकली. श्रीराम स्वराज ग्रुपने पाच थर लावून देवाची मानाची हंडी फोडत 21 हजार एक रुपयांचे बक्षीस पटकावले.
कोरोना काळानंतर झालेल्या या उत्सवात मालेगावकरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार डॉ. सुभाष भामरे, संघटनमंत्री रवि अनासपुरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश निकम, धर्मजागरण विभागप्रमुख प्रदीप बच्छाव, माजी नगरसेवक सुनील गायकवाड, समाजसेवक निखिल पवार, नितीन पोफळे, सुनील देवरे, रविष मारू, अरुण पाटील, सुधीर जाधव, शिवम शिंपी, अजय मंडावेवाला, विष्णू पाटोदिया, सुशांत कुलकर्णी, मच्छिंद्र शिर्के, शोभा सुमराव, सरला पाटील उपस्थित होते. संघटनेचे अध्यक्षव देवा पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रवीण खैरनार यांनी सूत्रसंचालन केले. श्रीराम स्वराज ग्रुप (श्रीरामनगर), ए. के. ग्रुप, अक्षय ग्रुप, वीर एकलव्य मित्रमंडळ अशा चार गोविंदापथकांनी सहभाग नोंदवला. श्रीराम स्वराज या मंडळाने पाच थर लावत हंडी फोडली. मंडळाला मानाचे चषक व मात्र 1 रुपया बक्षीस तसेच उपस्थितांनी 21 हजार रुपयांची रक्कम पारितोषिक स्वरूपात देऊन गौरव केला. याप्रसंगी स्कूल बसचालक भारती जाधव व मनपाचे स्वच्छता कर्मचारी लक्ष्मण सोनवणे यांचादेखील गौरव करण्यात आला. बालकृष्णाच्या वेशभूषेतील बालगोपालांनी लक्ष वेधले. उत्सव यशस्वीतेसाठी मनोज पाटील, अमित अलई, सुशांत कुलकर्णी, गणेश भावसार, प्रवीण खैरनार, अनिल पाटील, भावडू पाटील, मोनाली पाटील, मयूर पाटील, सुशील शेवाळे, करण जैन आदींनी परिश्रम घेतले.
हेही वाचा:
- पुणे : मोदींची सत्ता घालविण्याचे आमचे प्रयत्न सुरू राहतील: डॉ. कुमार सप्तर्षी यांची माहिती
- मंगळावर ऑक्सिजन निर्मितीचा नवा उपाय
- मुंबई : एटीएमची अदलाबदल करून फसवणूक करणार्या आरोपीस अटक
The post नाशिक : पाच थरांची दहीहंडी फोडून ‘श्रीराम’ने जिंकले एकवीस हजारांचे बक्षीस appeared first on पुढारी.