Site icon

नाशिक : पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते योजनांचे ई-भूमिपूजन; 51 गावे होणार जलसंपन्न

नाशिक (मालेगाव मध्य)  : पुढारी वृत्तसेवा
मालेगाव तालुक्यात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 51 गावांतील पाणीपुरवठा योजनेचे राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ई-भूमिपूजन झाले.

‘हर घर जल, हर घर नल’च्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र व राज्य शासन सातत्याने प्रयत्न करीत आहे. त्याचाच भाग म्हणून जलजीवन मिशन योजनेअंतर्गत या 51 गावांच्या पाणीयोजनेसाठी 112 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या योजनेतील कामेही दर्जेदार व गुणवत्तापूर्ण असून, ती लवकरात लवकर काम पूर्ण करावीत, असे मंत्री पाटील यांनी सांगितले. पालकमंत्री दादा भुसे यांनी, पाणी म्हटले तर प्रामुख्याने महिला भगिंनीचा जास्त संबंध येतो. दैनंदिन पाण्यासाठी होणारी महिलांची पायपीट थांबावी म्हणून ही योजना राबविण्यात येत असल्याचे सांगितले. कार्यक्रमास खासदार डॉ. सुभाष भामरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र जाधव, भिकन शेळके, सुनील देवरे, शशी निकम, सरपंच चंद्रकला सोनवणे, उपसंरच बेबीताई, देसले, दीपक देसले आदी उपस्थित होते.

या गावांचे ई भूमिपूजन…
निळगव्हाण, काष्टी, वडेल, अजंग, कोठरे बु. कोठरे खु, वडनेर, खाकुर्डी, वळवाडे, विराणे, पाहोण, टिप 1-2, निमशेवडी, कंक्राळे, लुल्ले, गरबड, गाळणे, नागझारी, डोगराळे, टिंगरी, वजिरखेडे, सायने खुृ, दहिकुटे, पळासदरे, कंधाणे, कौळाणे गा, घाणेगाव, वनपट, मोहपाडे, आघार बु., नांदगाव खु., सावतावाडी, कुकाणे, लेंडाणे, दाभाडी, डाबली, सातमाने, गारेगावं, चिंचवे, गा., वळवाडी, खडकी, भारदेनगर, भिलकोट, माणके, संवदगांव, चंदनपुरी, दाभाडी, 12 गावं, रावळगाव, झोडगे, कजवाडे, माळमाथा 26 गाव.

हेही वाचा:

The post नाशिक : पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते योजनांचे ई-भूमिपूजन; 51 गावे होणार जलसंपन्न appeared first on पुढारी.

Exit mobile version