नाशिक : पाणी जपून वापरा….. नाशिकरोडला गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार

पाणी योजना

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

नाशिकरोड विभागातील फिल्टर येथील स्वातंत्र्यसैनिक कंपाउंडमधील गोदावरी जलकुंभ भरणार्‍या पंपाच्या जलवाहिनीला गळती लागली आहे. त्यामुळे मनपाच्या वतीने गुरुवारी (दि.3) जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम केले जाणार असल्याने नाशिकरोड विभागातील प्रभाग क्रमांक 17, 18, 19 व 20 या चार प्रभागांमध्ये गुरुवारी(दि.3) सायंकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी (दि.4) सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

या भागांमध्ये पाणीपुरवठा बंद असेल….. प्रभाग क्र 17 – कॅनॉल रोड परिसर, नारायणबापू नगर, चंपानगरी, गोदावरी सोसा., दसकगाव, शिवाजीनगर, एमएससीबी कॉलनी, तिरुपतीनगर, टाकळी रोड परिसर, भीमनगर परिसर. प्रभाग क्र.18- शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, अयोध्या कॉलनी, पवारवाडी , इंगळे चौक, पंचक गाव सायखेडा रोड, भगवा चौक, शिवशक्तीनगर. प्रभाग क्र.19- गोरेवाडी. प्रभाग क्र.20- पुणे रोड परिसर, रामनगर, विजयनगर, शाहूनगर, लोकमान्यनगर, मोटवाणी रोड, कलानगर, आशानगर, जिजामातानगर.

हेही वाचा:

The post नाशिक : पाणी जपून वापरा..... नाशिकरोडला गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार appeared first on पुढारी.