नाशिक : पाळे खुर्दमध्ये कत्तलीसाठी जमा केलेल्या ९ जनावरांची सुटका; अभोणा पोलिसांची कारवाई

कळवण; पुढारी वृत्तसेवा : अभोणा पोलिसांनी कळवण तालुक्यातील पाळे खुर्द शिवारात बंद घरातील ९ जनावरांची सुटका केल्याची माहिती समोर आली आहे. ही जनावरे कत्तलीसाठी नेण्यासाठी एका घरात डांबून ठेवली असल्याच्या संशयानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकून कारवाई केली. याबाबत अभोणा पोलिसांनी मुद्देमाल हस्तगत करत दोघांना अटक केली. आरोपींविरोधात गोवंश हत्या प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाळे खुर्द (ता. कळवण) येथे अभिजित पाळेकर यांच्या बंद घरात दोन गाई एक वासरु सह अन्या सहा जनावरे विनापरवाना कत्तलीसाठी नेणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकली. यावेळी एका बंद घरात ही जनावरे ठेवली असल्याचे पोलिसांना घटनास्थळी आढळून आले. यानुसार पोलिसांनी आरोपींवर कारवाई करीत एकूण १ लाख ७५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला. याबाबत पोलीस नाईक विठ्ठल नथू महाले यांच्या फिर्यादवरुन प्राणी संरक्षण अधिनियम १९६० चे कलम ११ (अ) तसेच गोवंश हत्या प्रतिबंध कायद्यानुसार अर्जुन प्रकाश पवार व मोहन लक्ष्मण पाटील (दोघेही रा. पाळे खुर्द) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक यु एम तुंगार करीत आहेत.

हेही वाचा

 

The post नाशिक : पाळे खुर्दमध्ये कत्तलीसाठी जमा केलेल्या ९ जनावरांची सुटका; अभोणा पोलिसांची कारवाई appeared first on पुढारी.