नाशिक : पिंपळगाव बसवंतला भरदिवसा सोनसा‌खळीचोरी

सोनसाखळी चोर www.pudhari.news

नाशिक (पिंपळगाव बसवंत) : पुढारी वृत्तसेवा

शहरातील छत्रपती शिवाजी महाराजनगर परिसरात सेवानिवृत्त शिक्षिका सुशीला श्रीपतराव पाटील (७०, रा. छत्रपती शिवाजी महाराजनगर, पिंपळगाव बसवंत) यांच्या गळ्यातील ९६ हजार ६९० रुपये किमतीची तीन तोळ्याची सोन्याची पोत व पेंडंट खेचून दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी धूम ठोकली. गुरुवारी (दि. 4) सकाळी 9 ला ही घटना घडल्याने पिंपळगाव बसवंत शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत पिंपळगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातत्याने होणारी लूट आणि तपास लावण्यात येणारे अपयश यामुळे लुटारूंना अभय मिळत असून नागरिकांच्या सहनशीलतेचा व मानसिकतेचा गांभीर्यपूर्वक विचार करावा, अशी मागणी होत आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : पिंपळगाव बसवंतला भरदिवसा सोनसा‌खळीचोरी appeared first on पुढारी.