नाशिक : पितृपक्षास प्रारंभ झाला असून जाणून घ्या पितृपक्षाच्या श्राद्ध तिथी

पितृपक्ष www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भाद्रपद प्रतिपदा अर्थात पितृपक्षाला शनिवारी (दि. १०) प्रारंभ झाला. हिंदू पंचांगानुसार दि. २५ सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या पितृपक्षात आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती लाभावी, यासाठी तर्पण, पिंडदानाला अधिक महत्त्व आहे.

हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भाद्रपद प्रतिपदा ते भाद्रपद आमावास्या या कालावधीत होणाऱ्या पितृपक्षात पूर्वजांच्या आत्म्याला शांती व सद‌्गती लाभण्यासाठी तर्पण, पिंडदान, अन्नदानाला अधिक महत्त्व आहे. गोदाकाठी रामकुंड येथे तर्पण व पिंडदान विधी केल्याने पितरांना सद‌्गती प्राप्त होत असल्याची धारणा आहे. परिणामी पुढील 15 दिवस देशभरातून पिंडदानासाठी येणाऱ्या भाविकांमुळे गोदाकाठ गर्दीने फुलणार आहे. दरम्यान, पितृपक्षात काकभोजनाला अधिक महत्त्व असून, या काळात गायींना भोजन दिल्याने पुण्य प्राप्त होते, असेही मानले जाते. तसेच गरिबांना अन्न व वस्त्र दान करणे, हाही पुण्याचा भाग असल्याचे समजले जाते.

पितृपक्षाच्या श्राद्ध तिथी

११ सप्टेंबर : द्वितीय श्राद्ध, १२ सप्टेंबर : तृतीय श्राद्ध, १३ सप्टेंबर : चतुर्थी श्राद्ध, १४ : पंचमी श्राद्ध, १५ सप्टेंबर : षष्ठी श्राद्ध, १६ सप्टेंबर : सप्तमी श्राद्ध, १७ सप्टेंबर : श्राद्ध तिथी नाही, १८ सप्टेंबर : अष्टमी श्राद्ध, १९ सप्टेंबर : नवमी श्राद्ध, २० सप्टेंबर : दशमी श्राद्ध, २१ सप्टेंबर : एकादशी श्राद्ध, २२ सप्टेंबर : द्वादशी श्राद्ध, २३ सप्टेंबर : त्रयोदशी श्राद्ध, २४ सप्टेंबर : चतुर्दशी श्राद्ध, २५ सप्टेंबर : सर्वपित्री आमावास्या.

हेही वाचा :

The post नाशिक : पितृपक्षास प्रारंभ झाला असून जाणून घ्या पितृपक्षाच्या श्राद्ध तिथी appeared first on पुढारी.